सोनाक्षी सिन्हा नव्हे तर या 6 तारका देखील लग्नानंतर धर्म बदलायच्या फंद्यात पडल्या नाहीत, कोट्यवधी संपत्तीच्या आहेत मालकीण

धर्माचे अवडंबर सर्वसामान्यांमध्ये असते, प्रतिष्ठीत कुंटुंबात तर सर्रासपणे धर्म वगैरे न पाहता इंटरकास्ट मॅरेज केले जाते. त्यांच्या प्रेमात कधी धर्म आडवा येत नाही. बॉलिवूडच्या जगतात धर्म आणि जात सहसा प्रेमविवाहाच्या आड येत नाही.मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी असे म्हटले जाते.बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांच्या लग्नाला आता वर्ष होत आले आहे. दोघांनी आंतरधर्मिय लग्न केले आहे. सोनाक्षी ही हिंदू असून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक आहे. झहीर मुस्लीम परिवारातील आहे. दोघांनीही आपआपला धर्म बदललेला नाही. चला तर बॉलीवूडच्या तारकांनी कसे धर्माला आपल्या प्रेमाच्या आड येऊ दिलेले नाही....कोण आहेत या रुपेरी पडदा गाजवणाऱ्या तारका पाहूयात...

| Updated on: Feb 28, 2025 | 12:02 PM
1 / 6
सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. करिना आणि सैफ यांचा विवाह साल 2012 मध्ये झाला होता. करीना ही हिंदू पंजाबी आहे तर सैफ अली खान मुस्लीम धर्माचे असल्याने दोघांनी धर्म परिवर्तन केले नाही.

2 / 6
 रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा देखील वेगवेगळ्या धर्माचे आहेत. दोघांच्या प्रेमाच्या आड कधी धर्माची भिंत आडवी आलेली नाही. जेनेलिया ख्रिश्चन परिवारातील आहे. तर रितेश हिंदू धर्मातील आहे. दोघांनी आपआपल्या धर्माला आदराचे स्थान दिले असून दोघेही परस्पराच्या धर्माचे सण साजरे करतात.

3 / 6
अभिनेत्री प्रियांका चोपडा, गायक  निक जोन्स आणि त्यांची मुलगी न्यूयॉर्कमध्ये रहातात. प्रियांका चोपडा ही अभिनेत्री हिंदू कुटुंबातील आहे. तर निक जोन्स ख्रिश्चन आहे. दोघांनीही आपआपल्या धर्माचा आदर करीत तेच धर्म कायम ठेवले आहेत.लग्नानंतरही धर्म बदलेला नाही.

4 / 6
 अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाझ खान आता वेगवेगळे झाले आहेत. अरबाझ खान याच्या बरोबर विवाह केल्या तेव्हा दोघांनी धर्म बदलला नाही.मलायका आणि तिची आई ख्रिश्चन धर्माला फॉलो करते. मलायका हीने अरबाझ खान याच्याशी काडीमोड घेऊन बराच काळ उलटला आहे.आता तर मलायका हिचे अभिनेता अर्जून कपूर याच्याशी देखील  ब्रेकअप झाले आहे.

5 / 6
कुणाम खेमू आणि सोहा अली खान यांचा धर्म वेगवेगळा आहे.सोहा अली खान मुस्लिम आहे. तरीही ती हिंदू धर्माचे सगळे सण साजरे करीत असते. एका ती मंदिरात गेल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यावेळी तिने टीकाकारांनी चांगलेच उत्तर दिले होते. अभिनेत्री सोहा अलीने म्हटले होते की मंदिरात गेल्याने मी मुस्लीम धर्माचा आदर करीत नाही असे होत नाही. मी नमाज पढेल किंवा चर्चमध्ये जाईल तुम्हाला काय करायचं आहे असे सडेतोड उत्तर सोहा अली खान हिने दिले होते.

6 / 6
बॉलीवूडचा सुपरस्टार किंग खान शाहरुख आणि गौरी दोघांचाही धर्म वेगवेगळा आहे. शाहरुख मुस्लीम पठाण असून गौरी पंजाबी हिंदू परिवारातील आहे. या दोघांचे कॉलेजपासूनचे प्रेम असून त्यांच्या लग्नालाच ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यांचा विवाह १९९१ रोजी झाला होता.परंतू दोघांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करीत ते बदलले नाहीत. गौरीने एका मुलाखतीत मी हिंदू धर्माचा फॉलो करीत असून इस्लाम जर स्वीकारला नसला तरी पतीच्या धर्माचा आदर करते. हे दोघे दोन्ही धर्मचा सण एकत्र साजरे करतात.