
यूट्यूबने Made on YouTube 2025 इव्हेंट दरम्यान Veo 3 Fast नावाचे नवीन फीचर सादर केले आहे.

हे गुगलचे डीपमाईंडच्या व्हिडिओ जनरेशन मॉडलेचे कस्टम व्हर्झन आहे. ते शॉर्ट्सला एकीकृत करण्याचे इंटीग्रेट करण्याचे काम करते.

हे फीचर सर्वात जास्त फायद्याचे ठरेल. आता केवळ टेक्स्ट टाकून व्हिडिओ तयार करता येणार आहे. क्रिएटरला व्हिडिओ क्लिप्ससह विविध बॅकग्राऊंड आवाज पण मिळेल. म्हणजे आता महागड्या टुल्सची त्यांना गरज उरणार नाही आणि हे सर्व टुल्स पूर्णपणे मोफत असेल.

सुरुवातील Veo 3 Fast फीचर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात लाँच होणार आहे. पुढे हे फीचर इतर देशात रोलआऊट करण्यात येणार आहे.

युट्यूबने कंटेंट एडिटिंग अधिक सोपी होण्यासाठी Edit with AI नावाचे नवीन टूल समोर आणले आहे.

तुम्ही रॉ फुटेज मधून बेस्ट मोमेंट्स निवडून ते एडिट करु शकता. व्हिडिओ आकर्षक पद्धतीने तयार करू शकता.

या टूलमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्झिशन, बॅकग्राऊंड म्युझिक आणि व्हाईसओव्हर जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

सध्या युट्यूब क्रिएट प्लॅटफॉर्म आणि शॉर्टससाठी त्याची चाचणी सुरू आहे. हे फीचर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कंपनीने सांगितल्याप्रमाणे AI ने तयार केलेल्या कंटेंटवर SynthID वॉटरमार्क आणि लेबल पण लागलेले असेल. त्यामुळे युझर्सला हा व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे हे याची स्पष्टता येईल.