
ज्योतिषशास्त्रानुसार, 8 मूलांक असलेल्या लोकांवर शनीचा विशेष आशीर्वाद असतो. या लोकांना शिस्त आवडते आणि ते मेहनती असतात. परंतु वयाच्या 30 वर्षानंतर त्यांचे नशीब चमकण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 आहे त्यांचा मूलांक 8 मानला जातो. (photos : freepik)

असे म्हटले जाते की 8 मूलांक असलेल्या लोकांना वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत कठोर परिश्रम करावे लागतात. या काळात शनि त्यांची कठोर परीक्षा घेतो.(photos : freepik)

पण 30 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू लागते आणि हळूहळू ते श्रीमंत होऊ लागतात.

ज्याप्रमाणे शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत हळूहळू प्रवेश करतो, त्याचप्रमाणे 8 मूलांक असलेल्या लोकांनाही यश मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो.

पण हे निश्चित आहे की 8 मूलांक अंक असलेल्या लोकांना एक दिवस नक्कीच यश मिळेल. साधारणपणे, हा मूलांक असलेल्या लोकांना त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो परंतु 30 व्या वर्षानंतर त्यांच्या समस्या संपू लागतात.

मूलांक 8 असलेले लोक कोणतेही काम करण्यात घाई करत नाहीत. ते वेळ काढून, प्रत्येत काम उत्तम प्रकारे करतात. ज्यामुळे त्यांना शेवटी चांगलं यश मिळतें.

हा मूलांकाचे लोक हुशारीने, विचार करून पैसे खर्च करतात. यामुळेच काही काळानंतर त्यांच्याकडे चांगले पैसे जमा होतात.

8 मूलांक असलेले लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात, म्हणूनच ते कामात गुंतलेले राहतात. याच कारणामुळे त्यांना यश निश्चितच मिळतं. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)