
इप्मोस हेल्थ सर्व्हीस रिपोर्ट - 2024 प्रकाशित झाला आहे. त्यानुसार आपल्या भारतातील 47% लोक कॅन्सरने चिंताग्रस्त आहेत आणि 28 टक्के लोक लठ्ठपणामुळे टेन्शनमध्ये आहेत. परंतू या अहवालानुसार लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे.

लठ्ठपणा ही आजकाल सर्वात मोठी समस्या बनला आहे. हा आजार रहाणीमानाशी संबंधित आहे.ज्यामुळे अनेक खतनाक आजार होऊ लागले आहेत. बारीक होण्यासाठी बहुतांशी लोक डाएटपासून ते एक्सरसाईज आणि योगा करीत आहेत.भारतात कॅन्सरपेक्षाही लठ्ठपणा हा सर्वात घातक आजार बनल्याचा अहवाल सांगत आहे.

महिलांच्या आरोग्या संदर्भात या अहवालात काही शिफारसी केल्या आहेत. देशातील १३ ते २८ वर्षांच्या ५५ टक्के महिला मेंटल हेल्थने त्रस्त आहेत. अहवालाप्रमाणे जगभरात ५१ टक्के महिला मेंटल हेल्थच्या समस्येने ग्रस्त आहेत. पुरुषांचा आकडा महिलांपेक्षा १० टक्के कमी आहे.जगभरात मेंटल हेल्थ नंतर कॅन्सरला सर्वाधिक तणावाचा आजार म्हटले आहे. ३८ टक्के लोक कॅन्सरने तणावात आहेत.

अलिकडे देशात लॅण्सेटचा साल 2024 चा अहवाल आला त्यानुसार भारताची 70 टक्के लोकसंख्या लठ्ठपणा किंवा जास्त वजनाच्या कॅटगरीत येते. देशात सुमारे 30 दशलक्ष लोक लठ्ठपणाच्या फेऱ्यात आहेत. ज्यामुळे ताणतणाव आणि आणखीन काही आजार वेगाने वाढत आहेत.

लठ्ठपणा किंवा वजन वाढल्याने तणावात असलेल्यांची संख्या गेल्या एक वर्षांत 14 टक्क्यांनी वाढली आहे तर कॅन्सरच्या प्रकरणात 12 टक्के कमतरता आली आहे.गेल्या एक वर्षात लठ्ठपणाला अडचण मानणाऱ्यांची संख्या 14 टक्क्यांवरुन वाढून 28 टक्के झाली आहे.

लोकांमध्ये फिटनेस संबधी आता खूपच जागरुकता झाली आहे. आणि लोक आता एक्सरसाईज आणि वाढत्या वजनाला गंभीरतेने घेत आहेत. इप्सोसने हेल्थ सर्व्हीस रिपोर्ट - 2024 मध्ये 31 देशांच्या सुमारे 23 हजार लोकांचा समावेश केला होता. त्यातील 2,200 भारतीय आहेत.

लठ्ठपणा ही काही सामान्य समस्या नाही तर एक सायलेंट किलर आहे. ती स्वत:च एक आजार आहे. परंतू त्याहून खतरनाक गोष्ट म्हणजे ती अनेक जीवघेण्या आजारांना जबाबदार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने लठ्ठपणाला 'Global Epidemic' जागतिक साथीचा आजार म्हटले आहे.