
भारतात लाखो लोक मद्यशौकीन आहेत. या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची मद्ये आवडतात. परंतु या मद्यप्रकारांमध्ये एका विशिष्ट प्रकारचे मद्य काही लोकांना खूपच आवडते. विशेष म्हणजे हा ब्रँड एवढा प्रसिद्ध आहे, की जवळपास प्रत्येक मद्यपीने हे मद्य एकदातरी प्यायलेलेच आहे. गेल्या 71 वर्षांपासून या ब्रँडचे स्थान अजूनही कायम आहे.

या ब्रँडचे नाव ओल्ड मंक असे आहे. ओल्ड मंक ही एक रम असून या मद्याला 71 वर्षांचा इतिहास आहे. या आयकॉनिक डार्क रमचे उद्दापन मोहन मिकिन लिमिटेड या कंपनीकडून केले 1954 सालापासून केले जात आहे. गेल्या 71 वर्षांपासून आजही हा ब्रँड तेवढाच चर्चेत आणि लोकप्रिय आहे.

ओल्ड मंक ही रम वेगवेगळ्या प्रकारात मिळते. मात्र सर्वाधिक चर्चा ही 7 इयर्स वेटेड डार्क रमची होते. या प्रकारच्या रमला ओकपासून तयार करण्यात आलेल्या लाकडात साधारण 7 वर्षे ठेवले जाते. म्हणूनच या डार्क रमला तेवढी प्रसिद्धी आहे.

विशेष म्हणजे ओल्ड मंक या ब्रँडची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी आहे. त्यामुळेच ती सर्वाधिक लोपकप्रिय आहे. दिल्लीमध्ये 180 एमएलची ओल्ड मंक 355 रुपयांना मिळते. ओल्ड मंकची 750 एमएलची मोठी बॉटल एक हजार रुपयांना मिळते.

(टीप- मद्यप्राशन करणे आरोग्यास हानीकारक आहे. मद्यप्राशन केल्याने शारीरिक, आर्थिक, सामाजिक नुकसान होते. मद्यपानाला प्रोत्साहन देण्याचा या स्टोरीचा उद्देश नाही.)