
सध्या युपीआयचे युग आहे. स्कॅन करा आणि पैसा पाठविण्याचा झटपट जमाना आहे. पण पैसा पाठविताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर आर्थिक फटका बसू शकतो.

एखाद्या अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवत असाल तर हा क्रमांक गुगल जरुर करा. अनेकदा अशा ठगबाजीत फसवलेले नागरिक गुगलवर तो मोबाईल क्रमांक टाकून माहिती देतात.

UPI दुसऱ्या व्यक्तीची फारशी माहिती देत नाही. अशावेळी शंका असल्यास NEFT/IMPS च्या माध्यमातून रक्कम हस्तांतरीत करा. या प्रक्रियेत पैसे पाठविताना समोरच्याची बँकेची माहिती आपल्याकडे असते.

गडबडीत पैसे पाठवू नका. कारण एकदा पैसे चुकीच्या खात्यात गेले तर परत मिळविताना अडचण येते. अशावेळी पैसे पाठविणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code सर्वकाळी तपासा.

पूर्ण रक्कम पाठविण्याऐवजी सुरुवातीला 1-2 रुपये पाठवा. म्हणजे एखाद्यावेळी चूक झाली तरी मोठे आर्थिक नुकसान होणार नाही. योग्य व्यक्तीच्या खात्यात रक्कम पोहचली तर नुकसान टळते.

जर एखाद्या अनोळखी कंपनीला पैसे द्यायचे असतील तर धनादेशाच्या माध्यमातून रक्कम देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फसवणुकीपासून वाचू शकाल. तसेच याचा रेकॉर्ड पण जमा असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येईल.