
उंदीर हा असा प्राणी आहे, जो एकदा घरात घुसला की अनेक मौल्यवान वस्तू तो कुरतडून टाकतो. विशेष म्हणजे उंदीर एकदा घुसला की त्याला घरातून बाहेर काढणे फारच मुश्कील होऊन जाते. पण अशी काही झाडे आहेत, ज्यांच्यामुळे तुमच्या घरातील उंदीर बाहेर पळून जाऊ शकतो. खरं म्हणजे उंदराला ही झाडे आवडत नाहीत. त्यामुळे घरात ही झाडे लावल्यास तुमच्या घरातील उंदीर पळून जाऊ शकतात.

घराच्या आजूबाजूला लसूण लावल्यास तुमच्या घरातील उंदीर नाहीसे होऊ शकतात. लसून लावल्यास तुम्ही त्याचा स्वयंपाकातही उपयोग करू शकता. तसेच उंदरीही पळून जाऊ शकतात.

लॅव्हेंडरचे रोप दिसायला खूपच सुंदर आणि उपयोगी असते. या लॅव्हेंडरच्या रोपाचा सुगंधही खूपच छान असतो. पण हा सुगंध उंदराला आवडत नाही. त्यामुळे तुमच्या घराच्या परिसरात लॅव्हेंडरचे रोप लावल्यास तुमच्या घरातील उंदीर बाहरे जाऊ शकतात.

पुदीना हा शरीरासाठी आरोग्यदायी असतो. पुदीन्याची चटणी आवडीने घातात. पुदीन्याची चटणी तर अनेकांना आवडते. उंदराला मात्र पुदीन्याचा वास आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात पुदीन्याचे झाड लावल्यास तुमच्या घरातील उंदीर पळून जाऊ शकतात. घरात लेमनग्रास लावल्यावरही घरातील उंदीर पळून जाऊ शकतात. लेमनग्रासचे काही औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे तुम्हाला त्याचे अन्य उपयोगही होऊ शकतात.

कांद्याचे रोप घरात लावल्यावर उंदीर पळून जातात. कांद्याचे रोप लावल्यास तुम्ही कांदा स्वयंपाकासाठीही वापरू शकता. (सूचना- या लेखात दिलेली माहिती ही प्रातिनिधिक स्वरुपाची आहे. इंटरनेटवर आधारलेल्या माहितीवर हा लेख लिहिलेला आहे. तरी या लेखात दिलेल्या माहितीची अंमलबजावणी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)