
कॅप्टन कूल एमएस धोनी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटर्सला भारतीय सैन्यात आणि पोलिस दलात मानद रँकने सन्मानित करण्यात आले आहे. एमएस धोनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल आहे. धोनीने 2015 मध्ये पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग पूर्ण केली आहे.

क्रिकेटमधील देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सैन्य दलात मोठा हुद्दा देण्यात आला आहे. तेंडुलकरला भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टनची रँकने सन्मानित करण्यात आले आहे. क्रिकेटमधील असामान्य योगदानाबद्दल त्याला सन्मानित करण्यात आले.

भारतीय क्रिकेटला आत्मविश्वास देणारे आणि भारतात पहिला विश्वचषक आणणारे माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे सैन्य दलातील रँक आहे. त्यांना 2008 मध्ये लष्करात लेफ्टनंट कर्नल रँकने सन्मानित करण्यात आले होते.

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला ही असाच सन्मान देण्यात आला आहे. त्याला लष्करात अथवा अर्धसैनिक दलात स्थान मिळाले नसले तरी तेलंगाणा सरकारने त्याला पोलीस उपअधीक्षक(DSP) पदाने सन्मानित केले आहे. हा त्याचासाठी मोठा बहुमान ठरला आहे.

2007 मध्ये टी20 विश्वचषकात शेवटच्या षटकात कमाल दाखवणाऱ्या जोगिंदर शर्मा अनेकांच्या विस्मरणात गेला असेल. पण तो देशाची सेवा करत आहे. तो हरियाणा पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे. वर्ल्डकपनंतर क्रिकेटमध्ये त्याला मोठी चमक दाखवता आली नाही. पण पोलीस दलात त्याचे नशीब चमकले

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही पंजाब पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. जेव्हा खेळाडू कमाल दाखवतो. तेव्हा राज्य सरकार खेळाडूची एखाद्या पदावर नियुक्ती करते. महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर हरमनप्रीतला आता पदोन्नतीचे वेध लागले आहे.