
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर याचे मुख्यालय नष्ट झाले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत जावून बहावलपूर येथे असलेले जैश-ए-मोहम्मदचा अड्डावर कारवाई केली.

भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहर याची मोठी बहीण, तिचा पती, त्याचे भाचे, पुतणे अन् इतर नातेवाईक मारले गेले आहे. 1999 मध्ये मसूद अझहर याला भारताच्या कारागृहातून सोडण्यात आले होते. हल्ल्यात ठार झालेल्या इतर लोकांचा दफनविधी करण्यात आला आहे.

भारतच्या एअरस्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अझहर याच्या परिवारातील 10 सदस्य मारले गेले. तसेच त्याचे चार सहकारी ठार झाले. या एअरस्ट्राईनमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यासंदर्भातील फोटो पाकिस्तानमधून समोर आले आहे.

भारताच्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या मसूद अझहर याच्या परिवारातील सदस्यांचा दफनविधी गुरुवारी करण्यात येणार आहे. कुटुंबाचे सदस्य ठार झाल्यानंतर मसूद अझहर याचे वक्तव्य समोर आले होते. माझाही मृत्यू झाला असता, तर चांगले झाले असते, असे त्यांने म्हटले होते.

एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी ज्या मशिदीत राहत होते, ती मशीद उडवण्यात आली आहे. बीबीसीकडून उद्ध्वस्त झालेल्या मशिदीचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्यात मशिदीचे झालेले मोठे नुकसान दिसत आहे.