
स्मार्टफोन बाजारात ओप्पोने नवीन धमाका केला आहे. Oppo A6 Pro 5G लाँच झाला आहे. यामध्ये 7000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग, IP69 वॉटर डस्ट रेसिस्टेंस सारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

पाणी,धुळीचा या फोनवर परिणाम होणार नाही. हा फोन दिसायलाही आकर्षक आहे. विशेष म्हणजे तो काही मिनिटातच चार्ज होईल. हा फोन गेमिंग, मल्टिटास्किंगमध्ये अव्वल ठरवण्याचा कंपनीचा प्रयत्न कितपत खरा ठरतो हे लवकरच समोर येईल.

या फोनचे डिझाईन पण जबरदस्त आहे. तो विविध रंगात उपलब्ध आहे. सध्या फोन मिड रेंज किलर म्हणून लोकप्रिय ठरला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.57 इंचाची AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1400 निट्स पीक ब्राईटनेससह या फोनमध्ये इतरही अनेक फीचर्स देण्यता आले आहे. हा फोन 60 मिनिटात फुल्ल चार्ज होतो.

मीडियाटेक डायमेन्शन 6300 चिपसेट,AI गेम बुस्ट 2.0 फीचर, PUBG मोबाईल असे फीचर्स आहेत.

हा स्मार्टफोन ब्लॅक झेड, गोल्ड आणि ब्लू रंगात न्हाऊन निघाला आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनची किंमत 1799 युआन म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 21 हजार रुपये इतकी आहे.