Pune | पुण्यात जानाईदेवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन

| Updated on: Apr 11, 2022 | 8:39 AM

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो.पुण्यातील भोरमध्ये रामनवमी आणि जानाईदेवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं.

1 / 5
हिंदू धर्मग्रंथांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम (Ram) यांचा जन्म चैत्र महिन्यातील नवमीला झाला होता असे संदर्भ मिळतात. म्हणूनच चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

2 / 5
राज्यात सर्वत्र राम नवमी खूप उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

3 / 5
पुण्यातील भोरमध्ये रामनवमी आणि जानाईदेवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचे  आयोजन करण्यात आलं होतं. विजेतांसाठी रोख रकमेसह बुलेट दुचाकी, चांदीची गदा, म्हशी, बकरं अशा बक्षीसांची बरसात करण्यात आली.

4 / 5
यावेळी बाला रफिक शेख, सिकंदर शेख यांसारख्या नावाजलेल्या कुस्ती पटूनी यासाठी हजेरी लावली होती.भोर शहरामध्ये यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं.

5 / 5
हजारो कुस्ती शौकीनांनी कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. मागील दोन वर्षात कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नाही मात्र ह्या वर्षी निर्बंध शिथिल झाल्याने मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली.