Osmanabad Photo | येडशीच्या तरुणाची महामानवाला आदरांजली, गावात साकारले भले मोठे फायर पेंटिंग

| Updated on: Apr 13, 2022 | 4:34 PM

उस्मानाबाद : 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी होत आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय. उस्माबादमध्येही एका तरुणाने या महामानवाला आपल्या कलेतून आदरांजली अर्पण केली आहे.

1 / 4
उस्मानाबाद येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात येत आहे. येडशी येथील यशराज नलवडे या तरुणाने त्याच्या शेतात फायर पेंटिंग साकारली आहे. या चित्रातून भल्या मोठ्या आकाराचे डॉ. बाबासाहेबांचे पेंटिंग साकारण्यात आले आहे.

2 / 4
येडशी येथील यशराज नलवडे या तरुणाने  मोठ्या कौशल्याने  90 बाय 120 फुटात हे फायर पेंटिंग साकारले आहे. या पेंटिंगसाठी मागील चार दिवसांपासून तो मेहनत करत होता.

3 / 4
बरमाचीवाडी या गावात सलग 4 दिवसांच्या मेहनतीतून यशराज नलवडे या तरुणाने हे पेंटिंग साकारले आहे. शेतातील वाळलेले धान जाळून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. या कलाकृतीचे ड्रोनच्या माध्यमातून साकारलेले हे चित्र.

4 / 4
देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. उस्मानाबाद येथील तरुणानेदेखील मोठ्या कष्टाने बाबासाहेबांवरील निष्ठेचे दर्शन आपल्या कलाकृतीतून साकारले आहे.