
करपा रोगाचा प्रादुर्भाव : वातावरणात बदल झाला की, करपा रोग हा ठरलेला आहे. केळीवर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केळीच्या पानाला आणि खोडालाच धोका निर्माण झाला होता. केळीचे नवतीची पाने फाटली असून आता अंतिम टप्प्यातील न भरुन निघणारे नुकसान होत आहे.

वातावरण बदलाचा फटका : फळबागा ऐन बहरात असताना सुरु झालेला निसर्गाचा लहरीपणा अद्यापही कायम आहे. सुरवातीला अवकाळी पाऊस नंतर अतिवृष्टी, गारपिट आणि आता वाढत्या थंडीचा विपरीत परिणाम फळबागांवर होत आहे. यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे पण केलेला खर्च आणि वर्षभराच्या मेहनतीचे काय हा सवाल कायम आहे.

थंडीत वाढ झाल्याने निर्यातही लांबवणीवर पडत आहे. पण मागणी अधिक असल्याने याचा दरावर काही परिणाम होणार नाही

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे: वाढत्या रोगामुळे उपाययोजना काय करावी हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. शिवाय आता नुकसान म्हणजे थेट उत्पादनावरच परिणाम. वाढत्या थंडीमुळे करपा, चरका आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कृषी विभागाने यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यामध्ये अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने केळी बागांचे नुकसान होत आहे.