
काश्मीरमधील पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली येथील पर्यटक अतुल मोने यांचा मृत्यू झाला. मोने यांचे पार्थिव त्यांच्या डोंबिवली पश्चिम ठाकूर वाडी येथील राहत्या घरी आणन्यात आले आहे. त्यानंतर डोंबिवलीकरांनी रस्त्यावर सरकार आणि पाकिस्तानचा निषेध केला.

यावेळी सरकारी यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे, त्याच्यामुळेच हा आतंकवादी हल्ला झाला. सरकार फक्त पक्ष फोडण्यात गुंतलेले आहे. त्यांना सर्वसामान्यांबाबत काही देणे-घेणे नाही, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला. जेव्हा मंत्र्यांच्या पोरांवर असे हल्ले होतील तेव्हा याचं गांभीर्य त्यांना कळेल असंही या नागरिकांनी म्हटलं.

स्वर्गीय अतुल मोने आणि संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीत आणण्यात आले आहे.

तिन्ही पार्थिव बागशाळा मैदान येथे काही वेळासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

यावेळी डोंबिवलीकरांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्यांना साहेब जिवंत सोडू नका, त्यांनाही ठार करा, डोंबिवलीकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या (24 एप्रिल) डोंबिवलीत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.