PHOTO | डहाणू-चर्चगेट लोकल बंद केल्याने संतप्त प्रवाशांचा रेल रोको, राजधानी एक तास रोखली

| Updated on: Dec 02, 2020 | 10:18 AM

डहाणू रेल्वे स्थानकावरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल येत्या 3 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

1 / 6
पश्चिम रेल्वेवरील पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आज रेल रोको आंदोलन केले. यावेळी प्रवाशांनी 1 तास मुंबईकडे जाणारी राजधानी रोखून धरली.

2 / 6
डहाणू रेल्वे स्थानकावरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल येत्या 3 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी हे आंदोलन पुकारलं.

3 / 6
पश्चिम रेल्वेवरील मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन रद्द केल्याने दररोज पहाटे, सकाळी कामावर जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे. याला कंटाळून संतप्त प्रवाशांनी पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात गाड्या अडवल्या.

4 / 6
त्यानंतर पालघर रेल्वे स्टेशन मास्टरने प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रलला पाठविण्याचे, तसेच तिथे जावून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अडविण्यात आलेली लोकल मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली.

5 / 6
दरम्यान, सफाळे रेल्वे स्थानकातील लोकल प्रवाशांनी सर्व ट्रेन पूर्ववत होईपर्यंत रोखून धरल्याने पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील सर्व गाड्या विविध रेल्वे स्थानकात अडकून पडल्या

6 / 6
दरम्यान, काही प्रवासी मुंबई सेंट्रल कार्यालयात जावून ट्रेन रद्द करण्याविरोधात रेल्वे प्रशासनाला निवेदन देणार आहेत.