ना पक्का रस्ता, ना पूल; मुंबईजवळील गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मृत्यूशी झुंज

वाडा तालुक्यातील डोंगरपाडा गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पक्का रस्ता आणि पूल नाही. पावसाळ्यात पूर आल्याने मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. ग्रामस्थांनी तात्पुरता पूल बांधला आहे पण तोही अपुरे आहे.

| Updated on: Jun 23, 2025 | 10:10 AM
1 / 10
वाडा तालुक्यातील डोंगरपाडा गावातील विद्यार्थ्यांचे आणि ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आले आहे. वाडा तालुक्यातील रहिवाशांना दररोज जीवघेण्या लाकडी पुलावरून प्रवास करण्याची वेळ आली आहे, कारण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या गावाला अजूनही पक्का रस्ता आणि पूल मिळालेला नाही.

2 / 10
आपल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, या एकमेव काळजीपोटी ग्रामस्थांनी स्वतः लाकडी खांबांचा तात्पुरता पूल तयार केला आहे. या पुलावरून मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांना सोबत जावे लागते.

3 / 10
पावसाळ्यात नाला दुथडी भरून वाहू लागल्यास मुलांना शाळेत जाणे शक्य होत नाही. यश खरपडे नावाच्या एका पाच वर्षांच्या अंगणवाडीतील मुलाने आपली व्यथा मांडली "आम्हाला लाकडी पुलावरून यावं लागतं. पूल बुडला की आम्ही घरीच राहतो. तीन-तीन दिवस शाळेत जाता येत नाही, असे यशने म्हटले.

4 / 10
हीच परिस्थिती पाचवीत शिकणाऱ्या प्रीतम वसावडा या विद्यार्थ्यानेही सांगितली "पाऊस आल्यावर नाल्याला पूर येतो, मग आम्हाला पाच दिवस शाळेत जाता येत नाही, तेव्हा आम्ही घरीच राहतो." असे तो म्हणाला.

5 / 10
एका बाजूला पालक आणि दुसऱ्या बाजूला शाळेतील मुले असे पुरामुळे अडकून पडण्याचे प्रसंग अनेकदा घडतात. पूर कमी होण्याची तासनतास वाट पाहावी लागते. पाण्याचा वेग वाढल्यास ग्रामस्थांनी तयार केलेला तात्पुरता पूल वाहून जातो आणि त्यांना पुन्हा तो नव्याने तयार करण्याची कसरत करावी लागते.

6 / 10
गावात रस्ता नसल्यामुळे मुलांना रोज चिखलातून शाळेत जावे लागते. मोटारसायकल पाण्यातून न्यावी लागते आणि पाणी जास्त असल्यास शेजारच्या गावात गाडी ठेवून पायी यावे लागते.

7 / 10
विद्यार्थी, पालक आणि महिलांनी याबद्दल आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून गावकरी आमदार, पंचायत समिती आणि तहसीलदारांकडे या नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करत आहेत, पण आमची समस्या कोणीच सोडवत नाही," असे त्यांनी सांगितले.

8 / 10
गावात रस्ता नसल्याने एखादा रुग्ण आजारी पडल्यास त्याला डोलीत घालून मुख्य रस्त्यावर आणावे लागते. १५ घरांचा हा पाडा असून, दोन पाडे मिळून ३० घरे आहेत, पण त्यांना येण्या-जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही.

9 / 10
हे गाव वाडा तालुक्यातील आहे. "निवडणुका आल्या की फक्त आश्वासने दिली जातात आणि पाच वर्षांनी पुन्हा गावात आले की तीच आश्वासने. आमच्या कितीतरी पिढ्या हाच त्रास सहन करत आहेत. आमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. आम्ही जो त्रास सहन करतोय, तो या मुलांनी का सहन करावा? आमची विनंती आहे की आम्हाला जाण्या-येण्यासाठी पूल आणि रस्ता तयार करून ही समस्या दूर करावी." अशी मागणी केली जात आहे.

10 / 10
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन डोंगरपाडा येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.