
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची परभणीतील सेलू इथं जाहीर सभा झाली. या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच सरकारला ललकारलंय.

मुंबईला येण्याआधी पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीसा दिल्या. त्यावर जरांगेंनी भाष्य केलं. आम्ही कुठं म्हटलं आम्ही मुंबईला जाणारंय? पण जायचं असेल तर मुंबई आमची नाही का? आम्हाला पण शहर बघायचंय, तुम्हाला अडचण कसली आहे?, असा खडा सवाल मनोज जरांगे यांनी सरकारला केला.

मराठा लेकरांना आरक्षणामुळे नुकसान होऊ देऊ नका. एकही नेता मराठ्यांच्या बाजूला उभ राहायला तयार नाही. ज्याला मोठ केलं तोच म्हणतो. आरक्षण मिळू देणार नाही. सावध व्हा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil

मला तुमच्या साथीची गरज आहे. पाठबळ हवंय. सरकारने मला शत्रू मानलंय. पण मी मारायला घाबरत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला.