Swarup Sampat : परेश रावल यांच्या पत्नीने त्यांच्या केसांसाठी आदित्य धरला जबाबदार धरलं, ‘आज माझ्या या अशा..’

Parel Rawal Wife Swarup Sampat : परेश रावल यांची पत्नी एवढीच स्वरुप संपत यांची ओळख नाही. 'ये जो हैं जिंदगी' ही गाजलेली मालिका, की अँड का, साथिया आणि उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. परेश रावल यांच्या इतक्याच स्वरुप संपत सुद्धा अभिनयात सक्षम आहेत.

| Updated on: May 22, 2026 | 8:12 AM
1 / 5
स्वरुप संपत यांनी आदित्य धर सोबत काम करण्याचा अनुभव आणि धुरंधर चित्रपटाबद्दल व्यक्त झाल्या. आज तुमच्या डोक्यात कुठला चित्रपट आहे? यावर त्यांनी धुरंधर, धुरंधर, धुरंधर असं उत्तर दिलं. आदित्य धर सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना स्वरुप संपत म्हणाल्या की, तो खूप शांत स्वभावाचा आहे.

2 / 5
 उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाचं प्लानिंग चाललेलं. त्यावेळी माझे पती परेश रावल आणि माझा मुलगा आदित्य हे दोघे आदित्य धरला भेटले होते. ते त्या चित्रपटाबद्दल सतत बोलायचे. आमच्या घरी सुद्धा तोच विषय असायचा.  उरी द सर्जिकल स्ट्राइक मध्ये परेश रावल यांनी गोविंद भारद्वाजची व्यक्तीरेखा साकारली आहे. NSA अजित डोवाल यांच्यापासून ही भूमिका प्रेरित आहे.

3 / 5
एक दिवस मी दिल्लीतल्या माझ्या हॉटेलवर येत असताना आदित्य धरचा मला फोन आला. तो बोलला मॅडम उरी चित्रपटात तुमच्यासाठी एक रोल आहे. मी लगेच त्याला होकार दिला. तो समोरुन बोलला की, तुम्ही अजून स्टोरी ऐकलेलीच नाही.

4 / 5
त्यावर मी त्याला बोलले की, आमच्या घरी दिवसभर तुझ्या उरी चित्रपटाचीच चर्चा असते. ते सतत उरी बद्दल बोलत असतात. त्यामुळे मी तो रोल करतेय. त्यावर आदित्य धर आमच्या घरी आला व त्याने मला माझा रोल समजावून सांगितला.

5 / 5
आदित्य मला म्हणाला की, तुमची हरकत नसेल तर मॅडम माझा सल्ला आहे की, तुम्ही तुमचे केस रंगवू नका. मी त्याला ओके म्हटलं. त्यामुळे माझ्या या पांढऱ्या केसांसाठी तो जबाबदार आहे असं स्वरुप संपत गंमतीने म्हणाल्या. स्वरुप संपत यांनी उरी द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटात विकी कौशलच्या आईचा रोल साकारला होता.

Follow Us