
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी दिल्ली येथे साखरपुडा हा पार पडलाय.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडन येथे झाली असून अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. यांच्या साखरपुड्यातील अनेक फोटो व्हायरल झाले.

नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे राजस्थान येथे फिरण्यासाठी गेले होते. ते राजस्थानच्या उदयपुर शहरात गेले होते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे राजस्थानमध्येच राॅयल पध्दतीने लग्न बंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा उदयपुरमध्ये लग्नासाठी खास लोकेशन बघण्यासाठी गेल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. परिणीती चोप्रा ही तिच्या साखरपुड्यात अत्यंत भावूक झाल्याचे बघायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड स्टार हे राजस्थानमध्ये लग्न करण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसत आहे. कियारा-सिध्दार्थ, कतरिना आणि विकी काैशल यांनी देखील राजस्थानमध्येच लग्न केले.