नगरपंचायत निवडणुकीत फडणवीसांचा अंदाज ठरला खरा, आता पालिका निवडणुकीसाठी केलं मोठं भाकित; नेमकं काय होणार?
Devendra Fadnavis : आज राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. भाजपला या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.

मुंबई महानगरपालिका 2025 च्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे. 15 तारखेला पालिका निवडणुकींचे मतदान होणार आहे. तर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. 129 नगराध्यक्ष भाजपचे आले आहेत. युतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिकेत काय होणार याविषयी भाकीत केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेच्या मनात काय आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट झालं आहे. आमच्या महायुतीला नगर पालिकेपेक्षाही जास्त चांगले निकाल महापालिकेत मिळतील. या पेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा होईल. जिथे महायुती आली नाही आणि आली तरी आम्ही विकास काम करणारच. माझ्या मागच्याही कारकिर्दीत राज्यातील दोनशे शहरात पिण्याच्या पाण्याच्या योजनेला निधी दिला आहे. केंद्र सरकारनेही शहरीकरण हा अभिशाप नाही. शहरीकरण नियोजित केलं तर ६५ टक्के जीडीपी तयार होतो. त्यातून सामान्य माणसाचं जीवन बदलू शकतो. हे मी सांगायचो. तेच आम्ही आगामी काळात करणार आहोत.
नागपूर नगरपरिषद निकालावर काय म्हणाले?
नागपूर जिल्ह्यात आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचं यात विशेष श्रेय आहे. त्यांनी एका एका नगरपालिकेत लक्ष घालून काम केलं. त्यांनी ३०-३५ वर्षात पहिल्यांदाच कामठीत नगराध्यक्ष निवडून आला आहे. गडचिरोलीतही चांगलं यश आलं. १५ नगर पालिकेत आम्ही मेजॉरीटीत आलो. दुर्देवाने कमी मताने आम्ही तिथे पडलो. चंद्रपूरच्या ज्या नगरपालिकेत यश आलं नाही त्या कारणांची मिमांसा करू. महापालिकेची निवडणूक आहे, तिथे कुठे कमतरता राहिली ती दूर करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 129 नगराध्यक्ष भाजपचे आले आहेत. युतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपचे नगरसेवक २०१७मध्ये नंबर एक होतो. १६०२ नगरसेवक होते. आता ३३९५ नगरसेवक निवडून आलो आहोत. ४८ टक्के भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. आम्हाला प्रचंड मोठं जनसमर्थन मिळालं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षानेही चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आम्ही एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स आम्ही दिला आहे.
