
बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या धमाकेदार लूक्समुळे चर्चेत आहे.

नेहमीच नवनवीन फोटोशूट करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

नुकतंच तिनं ‘सायना’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

परिणीतीचा चित्रपटातला उत्साह या जबरदस्त ट्रेलरमधून दिसून येत आहे. परिणीती चोप्राचा हा पहिलाच बायोपिक चित्रपट आहे.

हा चित्रपट सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित आहे.

परिणातीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेट्सचा पाऊस पाडलाय.