
मनु भाकर हिने १० मीटर एअर पिस्तूल महिला गटात कांस्य जिंकले. नेमबाजीमध्ये वैयक्तिक पहिले पदक जिंकणारी ती भारताची पहिला महिला खेळाडू ठरली आहे. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकले.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनु भाकर ज्या पिस्तुलाने खेळत आहे तो मोरीनी या कंपनीचे आहे. मोरीनी कंपनीच्या CM 162EI या पिस्तुलाने ती ऑलिम्पिक खेळत आहे.

सरकारच्या परवानगीशिवाय हे पिस्तुल नेमबाजांनाही मिळत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय कोणीही या पिस्तुलाची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही.

मनुकडे मोरीनी कंपनीच्या पिस्तुलाचा परवाना आहे. कोणत्याही खेळाडूला ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर त्या खेळाडूंना नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) किंवा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) बंदूक देते.

10 मीटर एअर पिस्तुलमध्ये मनुने वापरलेले पिस्तुल हे 4.5 मिमी कॅलिबर आणि सिंगल लोडेड आहे. या गेमसाठी नेमबाज जास्त करून मोरोनी कंपनीचे CM 162EI या मॉडेलचे पिस्तुल वापरतात.