ना सुधा मुर्ती, ना गुंजन; Parel G बिस्किटाच्या पॅकेटवरील मुलीचं रहस्य 60 वर्षांनी उघड; कोण आहे ती?

पार्ले-जी हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विक्री होणारे बिस्किट आहे. १९२९ मध्ये स्वदेशी संकल्पनेतून सुरू झालेल्या या कंपनीने 'पार्ले-ग्लुको' ते 'पार्ले-जी' (जीनियस) असा प्रवास केला.

| Updated on: Nov 24, 2025 | 1:14 PM
1 / 10
भारतातील सर्वात लोकप्रिय, घराघरात पोहोचलेले आणि जगात सर्वाधिक विकले जाणारे बिस्किट म्हणून पार्ले जी बिस्किटाला ओळखले जाते. गेल्या  अनेक दशकांपासून पार्ले-जी हे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

2 / 10
१९२९ मध्ये एका स्वदेशी संकल्पनेतून १२ कामगारांपासून सुरू झालेली ही कंपनी आज वर्षाला ८००० कोटी रुपयांच्या बिस्किटांची विक्री करते. हा एक मोठा विक्रम आहे.

3 / 10
पार्ल जी बिस्किटाची चव, क्वॉलिटी आजही जशीच्या तशी आहे. विशेष म्हणजे या बिस्किटाचे पॅकेजिंगही जसेच्या तसे आहे. या बिस्किटाच्या पॅकेटवरील लहान मुलीचा फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. ही मुलगी कोण आहे? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो.

4 / 10
१९२९ मध्ये मोहनलाल दयाळ चौहान यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशी उत्पादनांच्या विचाराने प्रभावित होऊन मुंबईतील विलेपार्ले येथे 'पार्ले' कंपनीची स्थापना केली. बिस्किटे बनवण्याचे कौशल्य त्यांनी जर्मनी दौऱ्यादरम्यान आत्मसात केले होते.

5 / 10
त्यांनी बिस्किट बनवण्यासाठी लागणारी उपकरणे ६० हजार रुपये खर्च करुन जर्मनीहून आयात केली होती. त्यावेळी त्यांनी फक्त १२ कामगारांनी या कंपनीची सुरुवात केली, जी आज जागतिक ब्रँड बनली आहे.

6 / 10
सुरुवातीला हे बिस्किट मुलांना ग्लुकोजचा डोस देण्यासाठी पार्ले-ग्लुको या नावाने लाँच करण्यात आले. १९८० मध्ये कंपनीने ग्लुको ऐवजी फक्त G वापरण्यास सुरुवात झाली आणि त्याचे नाव पार्ले-जी झाले.

7 / 10
सुरुवातीला 'G' चा अर्थ ग्लुकोज होता. कालांतराने कंपनीने त्याचे रूपांतर जीनियस (Genius) मध्ये केले. याचा अर्थ हे बिस्किट खाणारे लोक जीनियस बनतील, असा संदेश देण्यात आला.

8 / 10
पार्ले-जी बिस्किटाच्या पॅकेटवरील या लहान मुलगी कोण याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. काही लोकांनी इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचा बालपणीचा फोटो पार्ले-जी बिस्किटावर असल्याचे सांगितले होते. काहींनी तिचे नाव नीरू देशपांडे किंवा गुंजन दुंडानिया असल्याचे म्हटले होते.

9 / 10
पार्ले-जी ग्रुपचे उत्पादन व्यवस्थापक मयंक शाह यांनी या सर्व अफवांवर पूर्णविराम लावला होता. मयंक शाह यांनी स्पष्ट केले की, बिस्किटाच्या पॅकेटवरील ही मुलगी कोणतीही खरी व्यक्ती नाही. तो केवळ एक काल्पनिक फोटो आहे.

10 / 10
हे चित्र १९६० मध्ये एव्हरेस्ट क्रिएटिव्ह आर्टिस्ट असलेले मगन लाल दहिया यांनी तयार केले होते. भारतातील लाखो लोकांच्या बालपणीचा भाग असलेली ही मुलगी केवळ एका कलाकाराची अविस्मरणीय कलाकृती आहे. जी आज ६० वर्षांहून अधिक काळ ब्रँडची ओळख म्हणून कायम आहे.