
मटार सोलण्यासाठी एक सोपी ट्रीक नक्की ट्राय करु पाहा. एका मोठ्या भांड्यात 1 लिटर पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात मटार घाला, भांडे झाकून ठेवा आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करा. नंतर, वाटाणे पाण्यातून काढून टाका.

गरम पाण्यातून मटार काढून टाकल्यानंतर, त्यांना ताबडतोब बर्फाळ पाण्यात बुडवा. यामुळे प्रत्येक वाटाणा त्याच्या कवचापासून वेगळा होतो. ही मटार सोलण्याची अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे.

या संपूर्ण प्रक्रियेनंतर, वाटाण्याच्या शेंगा हलक्या हाताने दाबा किंवा फिरवा. वाटाणे लगेच बाहेर येतील. जर तुम्हाला काही मिनिटांत 5 किलो वाटाणे सोलायचे असेल तर तुम्ही या स्वयंपाकघरातील हॅकचा वापर करू शकता.

सर्वांत महत्त्वाची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. गम पाण्यात मटार टाकल्यानंतर, ते जास्त वेळ उकळू नका, अन्यथा मचार अर्धवट शिजू शकतात. गरम पाण्यात सालासह मटार जास्त वेळ ठेवू नका.

सांगायचं झालं तर, मटार फक्त खाण्यास चविष्टच नासतात तर आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात जीवनसत्त्वे अ, क, ब, लोह, जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे अनेक आजार बरे करण्यास मदत करतात.