
आपल्यापैकी अनेकांना खाणं फिरणं या गोष्टी खूप आवडतात. ज्योतिष शास्त्रानुसार 4 राशीचे लोक खूप खाण्याचे शौकीन असतात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांना कधी कधी त्यांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

वृषभ - वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तो विलासी जीवनाचा कारक ग्रह आहे. या राशीच्या लोकांना प्रवास करणे, पार्टी करणे यांसारख्या गोष्टी आवडतात त्यांच्या या सवय त्यांना काही वेळा आरोग्याच्या समस्याही देते.

मेष - मेष राशीचे लोक खाण्याचे शौकीन असतात आणि त्यांना तळलेले जास्त कॅलरी आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ जास्त आवडतात. ते नवीन पदार्थ ट्राय करतात. हे लोक चांगले फूड ब्लॉगर देखील होतात.

मकर - मकर राशीच्या लोकांना अन्नातील पोषक तत्वे, कॅलरीज, चव याची चांगली जाण असते. खाण्यासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही आवड आहे. ते सामान्यतः पारंपारिक अन्न पसंत करतात.

सिंह - सिंह राशीच्या लोकांना मिठाई खायला आवडते. पण मिठाई खाऊन झाल्यावर ते कसरत देखील करतात. पण त्यांचे उर्वरित अन्न संतुलित आहे ते त्यांच्या तब्बेतीची जास्त काळजी घेतात. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)