दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ होणार, भारतासमोरील अडचणी वाढल्या
ऐन दिवाळाीत सर्वसामान्यांना झटका बसण्याची शक्यता आहे. डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासमोरील अडचणी वाढल्या आहेत .

इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाने होर्मुझची सामुद्रधुनीमधील दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. भारतात रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती कायम आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासमोर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
रशियातून भारताला तेल पुरवठा बंद झाला, तर देशातील तेल शुद्धीकऱ कंपन्यांना तेलाचा नवीन पुरवठा करणे अवघड जाईल. त्यामुळे भारतावर मध्य पूर्व, आफ्रिका आणि इतर देशातून तेल खरेदी करावं लागेल. त्यामुळे तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होईल.
केप्लरचे विश्लेषक सुमित रितोलिया यांच्या दाव्यानुसार, रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात केली. रशिया भारतासाठी प्रमुख पुरठवदार बनला.
रशियाकडून पुरवठा होणाऱ्या तेलाच्या किंमती इतर देशांपेक्षा कमी आहे. सागरी मार्गाने तेल वाहतुकीचा खर्च आता वाढला आहे. त्यामुळे रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त कच्च्या तेलाचा आर्थिक फायदा कमी झाला.
भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या आता तेल खरेदीसाठी मध्य पूर्व भागातील देशांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. मध्य पूर्व भागातील देश भारताच्या जवळ आहेत. त्यामुळे तेल आयातीचा खर्च कमी लागतो. परंतु रशियाने तेलाचा पुरवठा बंद केला, तर इतर देशांतून तेल भारतात उपलब्ध करणे आव्हानात्मक होईल.