
किंगखान शाहरुख खानचे चाहते आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

बॉलिवूडचं लाडकं कपल गौरी आणि शाहरुख खान यांनी एका स्पर्धेच्या माध्यमातून आपलं घर लोकांसाठी खुलं करण्याचं ठरवलं आहे. यासाठी एअरबीएनबीसोबत त्यांनी पार्टनरशीप केली आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

या स्पर्ध्येच्या विजेत्याला दक्षिण दिल्लीमध्ये असलेल्या गौरी आणि शाहरुखच्या घरात राहण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजमध्ये विजेत्यासह एक जण या घरात राहू शकणार आहे. या पॅकेजमध्ये 13 फेब्रुवारी 2021 ला एका रात्रीचा मुक्काम करता येणार आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी एक अर्ज भरावा लागणार आहे, ज्यात तुमच्यासाठी 'ओपन आर्म वेलकम' म्हणजे काय या प्रश्नाचं 100 पेक्षा कमी शब्दात उत्तर द्यायचे आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)

स्वत: शाहरुख आणि गौरी खाननं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. (फोटो - शाहरुख खान, इन्स्टाग्राम)