
मागील काही दिवसांत अहमनदरच्या जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलाय. मुसळधार पावसामुळे आणि नदीला जामखेड तालुक्यातील काही भागात नुकसानही झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे जामखेडच्या नायगाव मध्ये दाखल झाले. त्यावेळी कच्चा रस्ता आणि त्यावर चिखल व पाणी होतं. त्यामुळं स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन रोहित पवार थेट एका ट्रॅक्टरवर स्वार झाले आणि स्टेअरिंग हाती घेतलं.

जामखेडला पाणीपुरवठा होणारा भुतवडा तलावही पावसाने तुडुंब भरला आहे. या तलावावर जाऊन रोहित पवार यांनी जलपूजन केलं.

जलपूजनावेळी आमदार रोहित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळं रोहित पवार यांच्या मतदारसंघातील पाण्याचे साठवण तलाव भरले आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी आणि काझेवाडी तलावही पाण्याने पूर्ण भरला आहे.

या तलावावर जात रोहित पवार यांनी जलपूजन केलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.