Photo : कोण आहे मनिष भानुशाली? ज्याचे मोदी, शाह, फडणवीसांसोबत फोटो! राष्ट्रवादीचे गंभीर आरोप

| Updated on: Oct 06, 2021 | 3:35 PM

मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती हा मनिष भानुशाली आहे आणि तो भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप मलिकांनी केलाय.

1 / 5

2 / 5
इतकंच नाही तर मनिष भानुशाली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्याचंही मलिक यांनी म्हटलंय.

3 / 5
मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्यात प्रोफाईलवर भाजप उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्यामुळे एनसीबीनं सांगावं की त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी एनसीबीला विचारला आहे.

4 / 5
त्याचबरोबर भाजपकडून बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. 21 तारखेला मनिष भानुशाली हा दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर 22 तारखेला तो गांधीनगरमध्ये होता. 21 आणि 22 तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग्स मोठ्या प्रमाणात सापडल्याचं मलिक म्हणाले.

5 / 5
मनिष भानुशाली हा 28 तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता? कुठल्या मंत्र्यांना भेटला? याचं उत्तर एनसीबीनं द्यावं, असंही मलिक म्हणाले.