
विरारच्या हार्दिक पाटीलचा नवा विक्रम केला आहे. दुबई आणि ओमान येथे नुकत्याच पार पडलेल्या हाफ आयरमॅन स्पर्धा हार्दिकने हे घवघवीत यश संपादन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. हार्दिक पाटीलच्या यशाबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

25 फेब्रुवारीला ओमानमध्ये तर 5 मार्चला दुबईमध्ये दोन आठवड्यात दोन स्पर्धा पार पडल्या आहेत. हार्दिक पाटील यांनं आत्तापर्यंत 18 हाफ आणि 12 फुल आयरमॅन स्पर्धा पूर्ण केल्या असून एवढ्या स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे, अशी ही हाफ आयरमॅन ही स्पर्धा होती. ओमान येथे 7 तासांत तर दुबई येथील 6 तास 40 सेकंदात हार्दिक पाटील यांनी या स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.

हार्दिकने दुंबईमध्ये मोठं यश संपादन केलं असलं तरी त्याने यापूर्वी देखील विविध स्पर्धेत बक्षिसं पटकावली आहे. त्याच्या घरातील हे सर्व मेडल त्याच्या मेहनतीचा परिपाक आहेत.

आयरमॅन ही स्पर्धा खूप कसरतीचे असते त्यासाठी खूप सराव करावा लागतो. पण भारतातील तरुणांनी या स्पर्धेकडे वळले पाहिजे, असे अहवानहार्दिक पाटीलनं केलंय. हार्दिकच्या या घवघवीत यशाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.