Golden Bikini MP: सोन्याची हिरेजडित बिकिनी बनवणारी खासदार कोण?

Golden Bikini MP: सोशल मीडियावर सोन्याची हिरेजडित बिकिनी सध्याचे आकर्षण ठरली आहे. आता ही खासदार कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जाणून घेऊया या खासदाराविषयी

| Updated on: Jul 02, 2026 | 4:02 PM
1 / 5
सध्या सोशल मीडियावर सोन्यामध्ये बनवलेल्या हिरेजडीत बिकिनीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या एका छाप्यामध्ये महिला खासदाराच्या घरातून ही हिरेजडीत बिकिनी जप्त करण्यात आली. आता ही खासदार कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जाणून घ्या...

सध्या सोशल मीडियावर सोन्यामध्ये बनवलेल्या हिरेजडीत बिकिनीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या एका छाप्यामध्ये महिला खासदाराच्या घरातून ही हिरेजडीत बिकिनी जप्त करण्यात आली. आता ही खासदार कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जाणून घ्या...

2 / 5

या महिला खासदाराच्या घरातून ५७ मिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे ४९० कोटी रुपये) रोख रक्कम, २७ किलो शुद्ध सोने आणि सोन्यापासून बनवलेल्या ब्रा-पँटीसारख्या लग्जरी वस्तू जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

3 / 5

मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यांमध्ये ४७ हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे, ज्यात खासदार आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. सोन्याच्या ब्रा-पँटीबद्दल सर्वाधिक चर्चा होत आहे.

4 / 5

इराकमध्ये सध्या भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधी मोहीम सुरु आहे. या मोहिमेत इराक महिला खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर झालेल्या छाप्याची बातमी आणि तेथून जप्त करण्यात आलेल्या सामानाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

5 / 5

इराकी मीडिया आणि सोशल प्लॅटफॉर्म्सवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रोख रकमेचे ढीग, सोन्याच्या ईंटा आणि लग्जरी वस्तू दिसत आहेत. मात्र, या फोटोंचा खासदार हिंद अल-अब्बासी यांच्याशी खरोखर संबंध आहे का? याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us