
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आईसोबत जलसा बंगल्यात जाताना आराध्या ही दिसली.

आता आराध्या हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आराध्या बच्चन ही शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हेच नाही तर आराध्या बच्चन हिच्या गळ्यामध्ये आयकार्ड देखील दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही बोलताना दिसत आहे. आराध्या बच्चन हिचा व्हिडीओ प्रेक्षकांना आवडताना दिसतोय.

आराध्या बच्चन शाळेच्या ड्रेसमध्ये छान दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले. आराध्या बच्चन ही आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत विदेशात जाताना दिसली.

आराध्या बच्चन ही कायमच आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्पॉट होताना दिसते. अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये आराध्या जबरदस्त लूकमध्ये दिसली होती.