Photos: सुप्रिया सुळेंच्या लेकीचा शाही विवाहसोहळा, शरद पवारांच्या लूकने वेधले लक्ष
Photos: खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळेचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात शरद पवार यांच्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळेचा विवाहसोहळा काल 20 जून रोजी पार पडला. या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

रेवती सुळे यांचा विवाह सारंग लखानी यांच्याशी २० जून २०२६ रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. नातीच्या लग्नातील शरद पवारांच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे.

तसेच सुप्रिया सुळे यांच्या लूकची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांचे लेकीच्या लग्नातील लूकचे फोटो व्हायरल झाले आहेत.

लग्न समारंभात राजकीय, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, देवेंद्र फडणवीस, मुकेश अंबानी-नीता अंबानी, आदर पूनावल्ला आणि अनेकांच्या सामावेश आहे

बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणबीर कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. दोन्ही ठाकरे कुटुंबीय, मोहन भागवत यांसारख्या नेत्यांनीही हजेरी लावली.