लोखंडी सळ्या कापल्या, खिडकीतून आत एंट्री… शिंदेंच्या घरात चोर शिरले, सायरन वाजताच… पुढे काय घडलं?

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी झालेल्या चोरीचा प्रयत्न फसला. शिक्षिका सुरेखा शिंदे यांच्या धाडसामुळे आणि एका कामगार महिलेच्या सतर्कतेमुळे चोरांना रिकाम्या हाताने पळून जावे लागले.

| Updated on: Oct 10, 2025 | 3:22 PM
1 / 8
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये पिंपळनेर शहरात एक थरारक घटना घडली. राजमाता हॉकिंग परिसर प्रभात हॉटेलजवळ काल पहाटे सेवानिवृत्त शिक्षिका सुरेखा शिंदे यांच्या घरी दोन हिंदी भाषिक चोरांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, शिंदे मॅडम यांच्या हिंमतीमुळे आणि शेजारील कामगार महिलेच्या सतर्कतेमुळे चोरांना रिकाम्या हाताने पळून जावे लागले.

2 / 8
सुरेखा शिंदे यांच्या घरी पहाटेच्या शांत वेळी चोरांनी घराच्या पुढील खिडकीच्या लोखंडी सळ्या मशीनच्या साहाय्याने कापण्यास सुरुवात केली. याच वेळी, जवळच्या बांधकामावर राहणाऱ्या एका कामगार महिलेच्या ही गोष्ट लक्षात आली.

3 / 8
तिने आणि तिच्या मुलाने लगेच मोठ्याने आरडाओरडा करून चोरांना हटकले. यामुळे चोर गोंधळले आणि त्यांच्या चोरीच्या प्रयत्नात व्यत्यय आला. यामुळे चिडलेल्या एका चोराने त्या कामगार महिलेवर आणि तिच्या मुलावर दगडाने हल्ला केला.

4 / 8
तर दुसऱ्या बाजूला असलेल्या चोराने मागच्या खिडकीतून घरात प्रवेश केला. घरात चोर शिरल्याचे लक्षात येताच सुरेखा शिंदे यांनी जराही न घाबरता समयसूचकता दाखवली. त्यांनी त्वरित स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतले.

5 / 8
तसेच घाबरून न जाता त्यांनी त्वरित आपल्या मुलींना, नातेवाईकांना आणि पिंपळनेर पोलिसांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी अतिशय तत्परता दाखवत त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

6 / 8
पोलिस गाडीचा सायरन ऐकताच चोर घाबरले. त्यांना आता पकडले जाईल, याची भीती वाटू लागल्याने त्यांनी चोरीचा प्रयत्न सोडून लगेच पळ काढला. जवळपास २० मिनिटे चाललेला हा संघर्ष शिंदे मॅडम यांच्या हिंमत, धैर्य आणि कामगार महिलेच्या सतर्कतेमुळे यशस्वीरीत्या टळला.

7 / 8
पिंपळनेर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे राजमाता हॉकिंग परिसर शहराच्या बाहेरच्या बाजूला येतो. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

8 / 8
यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त अधिक वाढवावी, अशी मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटनांवर आळा बसेल आणि नागरिक सुरक्षित राहू शकतील.