ठरवून बनलंच नाही, एका लकेरीतून तयार केलं अजरामर मराठी गाणं; 54 वर्षांपासून प्रचंड क्रेझ

काही गाणी ठरवून बनत नाही, ही गाणी त्याचं वेगळंच नशीब घेऊन येतात. महत्त्वाचं म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील जुनी गाणी ही मनात घर करून राहणारी ठरतात. असंच एक गाणं आहे पिंजरा चित्रपटातील एक सदाबाहार गाणं ज्याच्या रचनेची कथा अत्यांत रंजक आहे.

| Updated on: Nov 20, 2026 | 2:17 PM
1 / 5
व्ही. शांताराम यांचा पिंजरा सिनेमा 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झाला, याला आता 54 वर्षे उलटूनही सिनेमातली गीते मनाच्या कप्प्यात घर करून आहेत.

व्ही. शांताराम यांचा पिंजरा सिनेमा 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झाला, याला आता 54 वर्षे उलटूनही सिनेमातली गीते मनाच्या कप्प्यात घर करून आहेत.

2 / 5

या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांनी मुख्य भूमिका निभावल्या. या चित्रपटातील गाणी अनेक गायकांनी गायली आहेत. या चित्रपटासाठी ११० गाणी लिहिण्यात आली. त्यापैकी ११ गाणी चित्रपटात घेतली गेली.

3 / 5

या ११ गाण्यांपैकी एक गाणे म्हणजे "गं... साजणी कुण्या गावाची, कुण्या नावाची, कुण्या राज्याची तू गं राणी..." हे गाणे मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हे गाणे कोरसमधील गायकाला दिले. ते होते विष्णू गायकवाड.

4 / 5

हे गाणे ठरवून नाही तर एका लकेरीतून बनले. संगीतकार राम कदम एकापाठोपाठ एक धुन गात होते, ही त्यातील लकेर व्ही. शांताराम यांच्या कानावर पडली. आणि मग काय? त्यांनी लगेच जगदीश खेबुडकर यांना या लकेरीवर गाणे लिहायला सांगितले.

5 / 5

व्ही. शांताराम म्हणाले, "हे गाणे तमाशाच्या फडाचे संपूर्ण जग उभे करेल असे तयार करा." नंतर खेबुडकरांनी शब्दांची छडी फिरवली आणि जन्माला आले सुपरहिट गाणे...

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us