Vastu Shastra Tips : घराची भरभराट करायची असेल तर या तीन पक्ष्यांचे फोटो लावा, त्यात मोराचा फोटो जास्त फायद्याचा

Vastu Shastra Tips : घरात सुख, समृद्धी आणि शांतता हवी ही प्रत्येकाची इच्छा असते. काहीवेळेला घरात कलह सुरु असतात. मानसिक शांतता हरवून जाते. अशावेळी काही पक्ष्यांचे फोटो तुमच्या बऱ्याच अडचणी दूर करु शकतात. त्या बद्दल समजून घ्या.

| Updated on: Mar 30, 2026 | 4:00 PM
1 / 5
 जर तुम्ही संकटांचा सामना करत असाल तर घरात काही पक्ष्यांचे फोटो लावण्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार घरात काही पक्ष्यांचे फोटो लावणं चांगलं असतं. घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहतं.

जर तुम्ही संकटांचा सामना करत असाल तर घरात काही पक्ष्यांचे फोटो लावण्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार घरात काही पक्ष्यांचे फोटो लावणं चांगलं असतं. घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहतं.

2 / 5

वास्तुशास्त्रानुसार या फोटोंमुळे तुमच्या काही अडचणी कमी होऊ शकतात. सोबतच प्रत्येक कामात प्रगती होऊ लागते. मान्यतेनुसार घराच्या लिविंग रुममध्ये गिधाडाचा फोटो लावणं चांगलं असतं. चायनीज वास्तू शास्त्रात गिधाडाला प्रगतीचं प्रतीक मानलं जातं.

3 / 5

हिंदू धर्माच्या मान्यतांमध्ये सुद्धा गिधाडाचं खास वर्णन आहे. हिंदू धर्मात गिधाडाला गरुडही म्हटलं जातं. गरुड हा विष्णू देवाचं वाहन आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात हंसाचा फोटो लावणही चांगलं मानलं जातं. हंसाचा फोटो दक्षिण पूर्व भिंतीवर आग्नेय कोनात लावला पाहिजे.

4 / 5

वास्तुशास्त्रानुसार हंसाच्या फोटोमुळे घरात सकारात्मकता येते. नशिबाची साथ मिळते. गरीबही श्रीमंत होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचा फोटो लावणं सुद्धा शुभ मानलं जातं. मोराच्या फोटोला सकारात्मकतेच प्रतीक मानलं जातं.

5 / 5

घरात कलह होत असेल तर मोराचा फोटो लावणं चांगल असतं. त्यामुळे वास्तू दोष दूर व्हायला मदत होते. घराच्या पूर्व बाजूच्या भिंतीवर हा फोटो लावला पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us