Marathi News » Photo gallery » Planetary conditions are in favor of these zodiac signs in 2022 there can be good growth in career find your rashi
Zodiac | 2022 मध्ये या 4 राशींच्या व्यक्तींचे करिअर गरुडझेप घेणार! चांगल्या संधी दार ठोठवणार
नवीन वर्ष 2022 मध्ये राहू, गुरु आणि शनि हे तीन ग्रह राशी बदलणार आहेत. 12 एप्रिल 2022 रोजी राहू मेष राशीत आणि 12 एप्रिल 2022 रोजी गुरू मीन राशीत प्रवेश करेल आणि 29 एप्रिल 2022 रोजी शनि मकर राशीतून कुंभ राशीत जाईल. 4 राशींसाठी ग्रह बदल शुभ मानले जातात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
येणारे 2022 हे वर्ष करिअरच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांसाठी खूप लकी ठरू शकते. या राशीच्या लोकांना चांगली वाढ होईल. जे लोक नोकरी बदलू पाहत आहेत त्यांनाही चांगले पर्याय मिळतील. फक्त पर्याय काळजीपूर्वक निवडा. पगारवाढीमुळे आर्थिक स्थितीही सुधारेल. या वर्षात खर्चावर नियंत्रण ठेवून पैसे वाचवणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचे राहील.
1 / 4
नवीन वर्ष वृषभ राशीसाठी भाग्यवृद्धी, पगारवाढ आणि पदोन्नतीची चांगली बातमी घेऊन येईल. मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले काम चालू ठेवा. नवीन वर्ष व्यापाऱ्यांसाठीही लाभदायक ठरणार आहे. नोकरीचे अनेक पर्याय तुमच्या समोर येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल.
2 / 4
मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप चांगले राहील. या वर्षी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी अनेक पर्याय मिळू शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेच्या कौशल्याने या परिस्थितीचा फायदा घ्यावा लागेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे तुम्हाला पूर्ण फळ मिळेल. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे.
3 / 4
कर्क राशीचे लोक नोकरीच्या शोधात असतील तर त्यांचा शोध नवीन वर्षात पूर्ण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अपेक्षित वाढ होणार आहे. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी येणारे वर्षही चांगली बातमी घेऊन येऊ शकते.