शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं धक्कादायक कांड, शेतात पोहचताच पोलीसही हादरले, डोळ्यावर विश्वासच बसेना…
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी थेट शेतावर छापा टाकला, समोरच दृष्य पाहून पोलिसांचेही डोळे फिरले, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, धाराशिव जिल्हा पोलिसांनी तब्बल 72 लाख 84 हजार रुपयांची अफूची झाडं जप्त केली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची झाडं जप्त करण्यात आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वाशी तालुक्यातील दशमेगाव येथे शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका उपप्रमुखाच्या शेतामध्ये ही अफुची झाडं आढळून आली आहेत. पोलिसांनी शेतात छापा टाकून ही झाडं जप्त केली आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार वाशी तालुक्यातील दसमेगाव येथे अवैध पद्धतीने अफुची लागवड करण्यात आली होती, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

शेतामधून तब्बल 485 किलो वजनाची अफूची झाडे पोलिसांनी जप्त केली आहे, जप्त करण्यात आल्या झाडाची किंमत ही जवळपास 72 लाख 84 हजार रुपयांच्या घरात आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान अफूची झाडे लागवड करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचा उप तालुकाप्रमुख समाधान उघडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.