PM Kisan Yojana: लवकरच मिळणार 22 वा हप्ता; पण तुमच्या खात्यात जमा होणार? असे तपासा

PM Kisan Yojana 22nd Installment: पीएम किसान योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. या योजनेतंर्गत 22 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. पण हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही, याची आताचा खातारजमा करा.

| Updated on: Jan 29, 2026 | 3:30 PM
1 / 6
PM Kisan Samman Nidhi Yojana 22th Installment: पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. रक्कम DBT अंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय आहे. ही योजना केंद्र सरकार चालवते.

2 / 6
या योजनेशी कोट्यवधी शेतकरी जोडल्या गेले आहेत. अल्पभूधारक शेतकरी या योजनेशी जोडल्या गेले आहे. शेतकऱ्यांना एका वर्षात तीनदा  2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. यंदा 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर होत आहे. त्यानंतर या योजनेचा 22 वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

3 / 6
या योजनेत तुमच्या खात्यात पैसा जमा होईल की नाही हे तपासण्यासाठी सर्वात अगोदर अधिकृत साईट  pmkisan.gov.in ला भेट द्या. अथवा संबंधित किसान प्लॅटफॉर्मवर जा. येथे शेतकरी  'Know Your Status' हा पर्याय निवडावा.

4 / 6
त्यानंतर संबंधित रकान्यात रजिस्ट्रेशन क्रमांक भरा. जर नोंदणीकृत क्रमांक माहिती नसेल, आठवत नसेल तर   'Know Your Registration Number' वर क्लिक करा. त्यावर हा क्रमांक माहिती होईल. तो क्रमांक 'Know Your Status'वर नोंदवा.

5 / 6
आता स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्चा कोड भरा. आता गेट डिटेल या बटणावर क्लिक करा. या ठिकाणी तुमचे स्टेटस दिसेल.आता तुम्हाला 22 वा हप्ता दिसेल की नाही याची माहिती मिळेल. या ठिकाणी तुमचे नाव दिसेल. नाव नसेल तर मग केवायसी केली की नाही हे तपासा.

6 / 6
पीएम किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक हप्ता जवळपास चार महिन्यांच्या अंतराने जमा करण्यात येतो. नोव्हेंबर 2025 मध्ये 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तर  22 वा हप्ता चार महिन्यांच्या अंतराने फेब्रुवारीत जमा होण्याची शक्यता आहे. याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.