Narendra Modi: लोकसेवेचा सोडला संकल्प… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली श्री विनायक मंदिरात पूजा अर्चा

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेच्या केंद्रस्थानी लोकांची सेवा करताना 25 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांनी आज दिवसाची सुरुवात श्री विनायक मंदिरात पूजा-अर्चा करून केली.

| Updated on: Oct 07, 2026 | 9:03 AM
1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला 7 ऑक्टोबर 2001 रोजी सुरूवात झाली. ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ते सातत्याने 25 वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. या निमित्ताने त्यांनी आज दिवसाची सुरुवात श्री विनायक मंदिरात पूजा-अर्चा करून केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला 7 ऑक्टोबर 2001 रोजी सुरूवात झाली. ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ते सातत्याने 25 वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. या निमित्ताने त्यांनी आज दिवसाची सुरुवात श्री विनायक मंदिरात पूजा-अर्चा करून केली.

2 / 6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील सरोजिनी नगरमधील श्री विनायक मंदिरात पूजा आणि अर्चा केली. आज ते भक्तीभावाने गणरायासमोर नतमस्तक झाले. तर यावेळी त्यांनी लोकसेवेचा संकल्प सोडला. पुजार्‍यांनी त्यांना तीर्थ प्रसाद दिला.

3 / 6

7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी देशातील दीर्घकाळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधान राहण्याचा विक्रमही नोंदवला आहे.

4 / 6

सामाजिक जीवनातून राजकीय प्रवासाचा त्यांचा हा झंझावात अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. गेल्या 17 सप्टेंबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत भाजपतर्फे सेवा संकल्प अभियान राबवल्या जात आहे.

5 / 6

गुजरात राज्यातील वडनगरसारख्या छोट्या शहरातून त्यांचा प्रवास सुरू झाला. 1974 साली गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. आणीबाणीविरोधात ते उतरले. त्यांनी भूमिगत आंदोलन केले.

6 / 6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेच्या केंद्रस्थानी सलग 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. राष्ट्र प्रथम आणि नागरिक प्रथम या तत्त्वांवर आधारीत त्यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us