
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी अचानक नव्या संसद भवानात पोहोचले. ज्याठिकाणी मोदी यांनी प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनात जवळपास एक तासापेक्षा अधिक वेळ होते. त्यांनी प्रत्येक कामाचं निरिक्षण केलं.

नवं संसद भवन बनवण्यासाठी जे मजूर मेहनत घेत आहेत, त्या मजुरांची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. शिवाय त्यांची विचारपूस देखील मोदी यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली होती.

नव्या संसद भवनाचा पहाणी करण्यासाठी जेव्हा पंतप्रधान मोदी पोहोचले तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते.


महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पामध्ये संसदेच्या नवीन इमारतीचाही समावेश होता. लोकसभेचा मजला मोराच्या थीमवर बांधण्यात येणार आहे.