
भारतात आलिशान आणि हायटेक गाड्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. प्रसिद्ध बिझनेसमॅन, बॉलिवूड स्टार, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांसारख्या मोठ्या व्यक्तींना महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करायला आवडते.

मुकेश अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही भारतातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांच्या कार कलेक्शनची अनेकदा चर्चा होत असते. आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की अंबानींकडेच फक्त महागड्या गाड्या आहेत.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातही तितक्याच अलिशान गाड्या आहेत. चला तर मग या दोघांच्या कार कलेक्शनमध्ये कोणत्या गाड्या आहे, त्यांची किंमत किती आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया.

पंतप्रधान मोदींकडे असलेल्या गाड्या फक्त आलिशान नाहीत, तर त्या सुरक्षिततेच्या बाबतीतही तगड्या आहेत. त्यांची प्रत्येक गाडी बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ आणि हायटेक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

मर्सिडीज-मेबॅक एस६५० गार्ड: ही गाडी जगातील सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक मानली जाते. यामध्ये व्हीआर १० लेव्हलची बुलेटप्रूफ सुरक्षा आहे, जी हँड ग्रेनेड आणि एके-४७ च्या गोळ्या सहन करू शकते. यात इनबिल्ट ऑक्सिजन पुरवठा आणि स्फोट-प्रतिरोधक खिडक्या आहेत. 2021 मध्ये रशिया भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी ही गाडी वापरली होती. तिची किंमत सुमारे १२ कोटी रुपये आहे.

रेंज रोव्हर सेंटिनेल: ही एक लक्झरी एसयूव्ही असून, यात सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यात 'रन-फ्लॅट टायर्स' आहेत, जे पंक्चर झाल्यानंतरही 50 किलोमीटरपर्यंत धावू शकतात. तिची बुलेटप्रूफ बॉडी आणि ब्लास्ट-रेझिस्टंट डिझाइन तिला खास बनवते. या गाडीची अंदाजे किंमत १० कोटी रुपये आहे.

बीएमडब्ल्यू ७ सिरीज हाय सिक्युरिटी: अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीपासून ही गाडी पंतप्रधानांच्या ताफ्यात आहे. यात बुलेटप्रूफ बॉडी, ऑक्सिजन टँक आणि शस्त्रास्त्रांपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे. तिची अंदाजे किंमत १० कोटी रुपये आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे गॅरेज एखाद्या कार संग्रहालयासारखे आहे. त्यांच्याकडे केवळ महागड्याच नाही, तर जगातील सर्वात कस्टमाइज्ड गाड्यांचा संग्रह आहे.

रोल्स-रॉइस कलिनन बुलेटप्रूफ ही अंबानी कुटुंबाची ही सर्वात महागडी गाडी आहे. सुरक्षिततेसाठी खास डिझाइन केलेली आणि बुलेटप्रूफ बॉडी असलेली ही गाडी सुमारे १७ कोटी रुपयांची आहे.

तसेच अंबानी कुटुंबाकडे मर्सिडीज-बेंझ एस ६८० गार्ड ही एक बुलेटप्रूफ सेडान असून, तिची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. त्यासोबतच रोल्स-रॉइस फॅन्टम ईडब्ल्यूबी ही नीता अंबानी यांची आवडती गाडी आहे. लक्झरी आणि स्टाइलचे उत्तम उदाहरण असलेल्या या गाडीची किंमत १४ कोटी रुपये आहे.

जर आपण अंबानी आणि मोदी यांच्या कार कलेक्शनबद्दल फरक करायचा झाला तर किंमतीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांच्या गाड्या पंतप्रधान मोदींच्या गाड्यांपेक्षा खूपच महाग आहेत. मात्र, दोन्ही गाड्यांचा उद्देश वेगळा आहे. पंतप्रधान मोदींच्या गाड्या केवळ सुरक्षेसाठी तयार केल्या जातात. त्या केवळ महागड्या नसून, त्यामध्ये हायटेक गियर, स्फोट-प्रतिरोधक वैशिष्ट्ये आणि आपत्कालीन बचाव प्रणाली देखील आहेत.

तर दुसरीकडे अंबानींच्या गाड्या लक्झरी आणि स्टाइलचे प्रतीक आहेत. त्यामुळे मुकेश अंबानींच्या गाड्या जगातल्या सर्वात महागड्या आणि कस्टमाइज्ड गाड्या आहेत. तर पंतप्रधानांच्या ताफ्यात असलेल्या गाड्या सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वोत्तम आहेत.