
मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या वाद सुरु आहे. महाराष्ट्रात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. आता औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा सकाळपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छत्रपती संभाजी नगरच्या ग्रामीण पोलिसांकडून खबरदारी घेण्यासाठी खुलताबाद शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नाकेबंदी करण्यात आली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

1 उपविभागीय पोलीस अधिकारी,3 पोलीस निरीक्षक, 1 एस आर पी एफ कंपनी, साध्या वेशातले काही पोलीस, 120 पेक्षा अधिक होमगार्ड जवान, खुलताबाद पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि इतर काही पोलीस कर्मचारी बंदोबस्तात हजर आहेत.