

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी 2 जुलै रोजी काका शरद पवार यांची साथ सोडली. दादांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.

इथेच काका-पुतण्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Ajit Pawar

ajit pawar and sharad pawar

Raj Thackeray Uddhav Thackeray

गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे महाराष्ट्रातील राजकारणातील काका-पुतण्यांची जोडी. धनंजय मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. काका गोपीनाथ राज्याच्या राजकारणात सक्रीय असताना धनंजय यांच्याकडे बीडच्या राजकारणाची जबाबदारी होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेले. यामुळे त्याच विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. इथून काका-पुतण्या यांच्यात वादाची ठिणगी पडली. धनंजय यांची नाराजी दूर करण्यसाठी विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अर्थात विधानपरिषदेत आमदारकी देण्यात आली. मात्र तोवर काका-पुतण्या यांच्या नात्यात गाठ पडली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी काकांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसचा हात धरला होता.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अवधूत तटकरे या काका-पुतण्यांची जोडीत काही वर्षांपूर्वी वाद रंगला होता. अवधूत तटकरे यांच्याकडे सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र सुनील तटकरे यांचे पुत्र अनिल तटकरे आणि कन्या आदिती तटकरे यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्यामुळे अवधूत तटकरे यांचं महत्वं कमी झालं. यामुळे काका-पुतण्यांमध्ये वाद पेटला. तेव्हा स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करत काका पुतण्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केलेला. मात्र पवारांनाही यात यश आलं नव्हतं. अवधूत तटकरे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीचा हात सोडत तत्कालिन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2 वर्षांनी अवधूत तटकरे यांनी 14 ऑक्टोबर 2022 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.