
सदगुरुंनी माती वाचवा चळवळ सुरू केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळतोय. या चळवळीत सामील होणारे महाराष्ट्र हे भारतातील पाचवे राज्य ठरले आहे

सदगुरुंनी माती वाचवा चळवळ सुरू केली आहे. याला अमृता फडणवीसांनीही पाठिंबा दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी सद्गुरुंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. याला त्यांनी या चळवळीत सहभागी व्हा असं कॅप्शन दिलं आहे.

सद्गुरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मृदा धोरण पुस्तिका दिली. माती वाचवा मोहिमेला पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

आदित्य यांनीही या मोहिमेत सहभागी होण्याचं आवहन केलंय. "माती वाचवण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या नाहीत तर येणारी पिढी असं पर्यावरण बघू शकणार नाही, त्यामुळे या मोहिमेत आपण सहभाग घ्यालाच हवा", असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.