महिला क्रिकेटर्सकडून मार, मित्राकडून नको ते आरोप… स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर पलाशचे वाईट दिवस, आता पोहोचला कोर्टात
पलाश मुच्छलवर स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर तिच्या बालपणीच्या मित्राने नको ते आरोप केले. या मित्राने स्मृतीच्या महिला क्रिकेटर्स मैत्रिणींनी चांगला चोप दिल्याचे देखील सांगितले. त्यानंतर आता पलाशने मोठे पाऊल उचलले आहे.

सिंगर-कंपोजर पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधाना हे गेल्या वर्षीची लग्न बंधनात अडकणार होते. त्यांच्या लग्नसोहळा हा सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. हळद, मेहंदी आणि संगीत समारंभांनंतर शेवटी दोघांचे लग्न मोडले. ही बातमी वणव्यासारखी पसरली. स्मृती आणि पलाश यांचे लग्न मोडल्यानंतर सिंगर आणि कंपोजरच्या बेवफाईची चर्चा जोरात सुरू झाली. दावा केला जात होता की, पलाश बराच काळ स्मृतीची फसवणूक करत होता. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नादरम्यानच त्याचे दुसऱ्या मुलीशी अफेअर चालू होते असे सांगितले जात होते. या सर्व अफवांमध्ये आता क्रिकेटरच्या जुन्या मित्राने आणि अभिनेता-प्रोड्यूसर विद्यान माने याने पलाश मुच्छलबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
याच संदर्भात प्रत्युत्तर देताना पलाश मुच्छलने पूर्वीचा जवळचा मित्र असलेल्या विद्यान मानेवर मानहानिचा खटला दाखल केला आहे. सिंगरने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे, त्यांच्या वकिलाने अभिनेता विद्यानला १० कोटी रुपयांची मानहानि नोटीस पाठवली असल्याचे सांगितले आहे.
पलाश मुच्छलने विद्यान मानेवर केला मानहानीचा खटला दाखल
पलाशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये, ‘माझ्या वकिलाने श्रेयांश मितारे यांनी सांगलीचे विद्यान माने यांना ₹१० कोटींचा मानहानिची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कारण त्यांनी माझ्याविरुद्ध खोटे, अपमानजनक आणि अत्यंत मानहानिकारक आरोप लावले आहेत, ज्याचा उद्देश माझी प्रतिष्ठा आणि इमेजला नुकसान पोहोचवणे आहे’ असे म्हटले आहे.
पूर्ण प्रकरण काय होते?
अलीकडील विधानात पलाश आणि स्मृती यांचा कॉमन फ्रेंड विद्यान माने याने म्हटले की, सिंगर-कंपोजरचे संपूर्ण कुटुंबच चोरटे आहे. ते सर्व एकसारखे आहेत. त्यांनी पलाशबाबत धक्कादायक खुलासा करत सांगितले की, त्यांना अपेक्षा होती की लग्नानंतर तो सुधारेल आणि सांगलीत नव्याने आपल्या कुटुंबाची सुरुवात करेल. मात्र पलाशचा स्वभावच सुधारण्यासारखा नव्हता. याबाबत पुढे बोलताना विद्यान मानेने सांगितले की, पलाशला स्मृती सोबत लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या मुलीच्या बेडवर रंगे हात पकडले होते. ते भयंकर दृश्य पाहून फिमेल क्रिकेटर्सनी पलाशला खूप मारहाण केली होती. आता या आरोपांमुळे सिंगरला मिरची लागली आणि त्याने सोशल मीडियाद्वारे आपली सफाई देत म्हटले की, विद्यान त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
