AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढी मेहनत फुकट..; ‘क्रांतिज्योती विद्यालय’च्या प्रॉडक्शनने तंबी देताच शाळांवर नेटकरीही चिडले

चित्रपटाच्या टीमची एवढी मेहनत अशी फुकट का घालवत आहात, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात 'क्रांतिज्योती विद्यालय'च्या टीमने संबंधित शाळांना आणि व्यक्तींना तंबी दिली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे, ते सविस्तर वाचा..

एवढी मेहनत फुकट..; 'क्रांतिज्योती विद्यालय'च्या प्रॉडक्शनने तंबी देताच शाळांवर नेटकरीही चिडले
krantijyoti vidyalay marathi madhyam Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 25, 2026 | 11:59 AM
Share

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. एकीकडे थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल असताना दुसरीकडे काही शाळांमध्ये या अवैध प्रतींचा वापर करून विद्यार्थ्यांना शोज दाखवले जात आहेत. हा एक प्रकारे पायरसीचाच प्रकार असल्याने यासंदर्भात आता ‘क्रांतिज्योती विद्यालय’च्या टीमने तंबी दिली आहे. संबंधित संस्था किंवा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही टीमने दिला आहे. यानंतर नेटकऱ्यांनीही संंबंधित लोकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रॉडक्शन टीमची पोस्ट-

‘सर्व शाळांसाठी कायदेशीर सूचना.. चलचित्र मंडळी, ही निर्मिती संस्था ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाचं एकमेव कॉपीराइट धारक आहे. सदर चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित झाला आहे. परंतु आमच्या निदर्शनास आलं आहे की काही व्यक्ती आणि संस्था काही शाळांमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अवैध प्रतींचा वापर करून शाळेच्या आवारात चित्रपटाचा खेळ आयोजित करत आहेत. कृपया नोंद घ्यावी की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये सदर चित्रपटाचे खेळ आयोजित करण्यासाठी आम्ही कोणालाही अधिकृत परवानगी दिलेली नाही. सदर चित्रपटाचे असे कोणतेही बेकायदेशीर प्रदर्शिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही संस्था/ व्यक्तींवर कॉपीराइट कायदा, 1957, सिनेमॅटोग्राफ (दुरुस्ती) कायदा, 2023 तसंच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा प्रॉडक्शन टीमने दिला आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘ज्या कोणत्याही संस्था/ व्यक्तींना सदर चित्रपटाचे कायदेशीर आणि अधिकृत प्रदर्शन आयोजित करायचे असल्यास, त्यांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा. लवकरच ‘मराठी शाळा आठवडा’ या आमच्या आगामी सवलत दराच्या योजनेची अधिकृत सूचना जाहीर होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नियमांचं पालन करून सहकार्य करावं ही नम्र विनंती.’

या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘विषय शाळेचा असला तरी चोरुन चित्रपट दाखवणं गुन्हा आहे आणि चित्रपटच्या टीमची एवढी मेहनत अशी फुकट कशी काय दाखवत आहेत,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘चित्रपटाचा मूळ उद्देश मराठी शाळा वाचवण्याचा आणि टिकवण्याचा आहे आणि मराठीचं महत्त्व सांगण्याचा आहे. शाळा महाविद्यालयांचा हेतू चांगला आहे पण चित्रपट दाखवण्याचा प्रकार कायदेशीररित्या चुकीचा आहे. हा चित्रपट काय पण कुठल्याही चित्रपटाची पायरसी करणं हा खूप मोठा गुन्हा आहे. कदाचित शाळा महाविद्यालयांना या गोष्टीचा महत्त्व माहिती नसावं म्हणून त्यांच्यातून चुकून हे घडत असेल,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.