

आरोपी रात्री उशीरा घरी यायचे आणि सकाळी लवकर जायचे, त्यामुळे आम्ही त्यांना पाहिलं नाही. त्यांचे चेहरे देखील आम्हाला आठवत नाहीत... अशी माहिती चाळीतील इतर लोकांनी दिली आहे.

स्थानीक पोलीस देखील याठिकाणी येऊन गेल्याची माहिती मिळत आहे. चाळीत फक्त तीन ते चार घरं आहेत, त्यामुळे आरोपींना पटेल चाळीची राहण्यासाठी निवड केली अशी माहिती देखील समोर येत आहे.

दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणार आरोपींच्या चौकशीत मोठा खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी दोघांना देखील मारण्याचे आदेश होते...

चौकशी दरम्यान आरोपी धक्कादायक कबुली देत आहेत. शनिवारी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादारी गुंड लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकराली असून सलमान खान आणि दाऊद इब्राहिमच्या बाजून जो असेल त्याची हत्या करु धमकी दिली.