
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी | 05 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही पक्षप्रवेश होत आहेत. नुकताच झालेला एक पक्ष प्रवेश सध्या चर्चेत आहे.

बोरिवलीतील वादग्रस्त व्यक्तिमत्व आणि एकेकाळी गॅंगस्टर राहिलेले मंदार बोरकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई भाजप अध्यक्ष-आमदार आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभा आणि मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंदार बोरकर यांचा पक्ष प्रवेश सध्या पश्चिम उपनगरात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय जनता पार्टी माध्यमातून आक्रमक राजकारणाला सुरवात झाल्याची चर्चा आहे.

मंदार बोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बोरकर यांचं व्यक्तिमत्व वादग्रस्त असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.