गाड्यांचा ताफा, कार्यकर्त्यांचा गराडा, अन् जनतेचं प्रेम; आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचे बंजारा महिलांकडून खास स्वागत

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आता आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचे ठिकठिकाणी स्वागत कjरण्यात येत आहे.

1/5
मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आता आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.

2/5
विधानपरिषदेवर निवड झाल्यामुळे त्या ठिकठिकाणी भेट देत जनतेचे आभार मानत आहेत. यावेळी कार्यकर्ते, सहकारी, ग्रामस्थ आणि इतर नागरिक त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत.

3/5
त्यांनी रॅलीदरम्यान आज हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील बोर्जा फाटा येथे भेट दिली. यावेळी त्यांचे बंजारा समाजाच्या महिलांनी खास शैलीत स्वागत केले.

4/5
येथील बंजारा समाजातील महिलांनी प्रज्ञा सातव यांना पारंपरिक कपडे परिधान करण्याचा आग्रह धरला. सातव यांनीदेखील महिलांच्या आग्रहाला मान देत बंजारा समाजातील महिलांचे खास कपडे परिधान केले.

5/5
यावेळी सातव यांचे येथील महिलांनी जल्लोषात स्वागत केले. सातव यांनी सर्वांचे आभार मानले. नंतर रॅलीदरम्यान हिंगोली येथे प्रज्ञा सातव यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच औंढा नागनाथ येथे अहिल्यादेवी होळकर यांनादेखील त्यांनी अभिवादन केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI